देवचार / क्षेत्रपाल / महापुरुष / राखणदार
देवचार म्हणजेच देवाचा एक अवतार...
तर आजच्या कथेचे नाव आहे देवचार. आधी मी तुम्हाला देवचार म्हणजे काय ते सांगतो देवचार म्हणजेच देवाचा एक अवतार ज्याला काही ठिकाणी क्षेत्रपाल, महापुरुष किंवा राखणदार असेही म्हटले जाते.
मजबूत देहयष्टी, सफेद धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात घुंगरू लावलेली काठी आणि एका हातात मशाल असा एकंदर देवाचा अवतार असतो.
प्रत्येक गावात देवचाराची एक ठरलेली वाट असते ज्या वाटेवरुन देवचार गावातून फेरी मारतो. अशा वाटेला गावात देवाची वाट असे ही म्हटले जाते.
गावातील एका जागेवर देवचाराचे स्थान असते इकडे गावकरी येता-जाता देवचाराचे दर्शन घेतात.देवचार , महापुरुष याचे मंदिर किंवा मोठा वृक्ष कोकणात प्रत्येक गावी पहावयास मिळतात.
ज्याप्रमाणे देवचार गावातील लोकांचे रक्षण करतो त्याचप्रमाणे गावकर्यांना देखील त्याचे काही नियम पाळावे लागतात जसे कि देवचाराच्या वाटेवर कधीच घाण किंवा कचरा करू नये. देवाच्या वाटेवर कधीच झोपू नये
किंवा कसलाही अडथळा आणू नये. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळी जर तुम्हाला देवचाराचे दर्शन झाले तर न घाबरता किंवा न किंचाळता गप्प डोळे मिटून घेणे.
कारण जर कोणी भीतीने ओरडला अथवा किंचाळला तर देवाची ती परिक्रमा भंग होते आणि मग त्या माणसाला त्याची शिक्षा मिळते. जर एखादेवेळी कोणी माणसाने देवचाराच्या वाटेवर घाण किंवा कचरा टाकला तर देवचार त्या माणसाच्या घराभोवती आपल्या काठीचा आणि त्याला लावलेल्या घुंगुरांचा आवाज करतो त्यावरून त्या माणसाने समजून जावे कि नकळत आपली काहीतरी चूक झालेली आहे
परंतु असे पुन्हा पुन्हा घडत राहिले तर देवचार त्याला चांगलीच अद्दल घडवतो.
अशीच घडलेली एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मालती काकू आणि सत्यवान काका अगोदर मुंबईत राहत होते त्यांची दोन्ही मुलं आता शिकून मोठी होऊन आपापल्या संसारात गुंतलेली. रिटायरमेंट नंतर गावी जाऊन राहायचा विचार काका काकु करू लागले होते . शेवटी गावाकडे एक छोटास घर बांधायचा निर्णय त्यांनी घेतला.सत्यवान काकांचा देवावर खूप विश्वास परंतु रूढी परंपरांना अंधश्रद्धा मानून त्यांवर कधीहि विश्वास न ठेवणारे होते.
त्यांनी आपल्या वाटेच्या जमिनी शोधायला चालू केल्या. शेवटी त्यांना एक जागा पसंद पडली. आणि
काका काकूंचे घर बांधायचं काम सुरु झाले . मात्र घराच्या जमिनीला लागूनच एक पायवाट होती. आसपासच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाने हि वाट देवाची होती. त्यांनी सत्यवान काकांना याबद्दल सांगितले होते परंतु काकांना हे काही पटले नाही त्यांचा मात्र या गोष्टींवर विश्वास बसला नाही.
त्यांनी त्यांचं घराचं काम नेहमीप्रमाणे चालूच ठेवले.
एके दिवशी घरासाठी लागणाऱ्या समांनापैकी काही सामान हे त्या वाटेवर देखील ठेवले गेले होते. परंतु दुसऱ्या दिवशी हे सामान अस्ताव्यस्त दिसायचे.आणि असे दोन तीन वेळा झाले . काकांना मात्र हे गावातील कोणीतरी मुद्दामहून केले असेल असेच वाटायचे.
असे करत करत घर तयार झाले.... गृहप्रवेश झाला....
अगदी १-२ दिवसात काकूंना घरातील कचरा कुठे टाकावा असa प्रश्न निर्माण झाला. काकांनी त्यांना एक कचरा टाकण्यासाठी खड्डा करून दिला. काकूंनी आज दिवसभर साठलेला कचरा सायंकाळी त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकला . नेहमीप्रमाणे जेवून झाल्यावर काका काकू झोपण्याची तयारी करत होते.काकांनी पण त्या दिवशी बरीच कामे केली होती त्यामुळे तेही पटकन झोपी गेले.दोघेही गाढ झोपेत होते. आता मध्य रात्र झाली होती.अचानक... रात्री 3 वाजण्याचा सुमारास घराच्या बाहेर जोरजोरात आदळणार्या काठीचा आणि घुंगरूचा आवाज यायला सुरुवात झाली. त्या भयाण आवाजाने मालती काकूंना जाग आली होती.त्या घाबरल्या .
काकूंनी काकांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तोपर्यंत.. आवाज बंद झाला. आता काकू मात्र भलत्याच घाबरल्या होत्या. त्यानंतर मालती काकूंना झोपच आली नाही. त्यांना तो काठीचा आणि घुंगरूचा आवाज कानांवर अजूनही स्पष्ट ऐकू yet होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी हे सर्व काकांना सांगितलं. परंतु काकांनी मात्र यावर विश्वास ठेवला नाही. ya दिवशी सुद्धा सायंकाळी रोजचा प्रमाणे काकूंनी घरातील सर्व कामे आटोपून कचरा नेहमीच्या जागी टाकला.आणि रात्री काका काकी झोपायची तयारी करू लागल्या. काकी च्या मनात भीती होतीच . शेवटी काका काकी थोड्या गप्पा मारून झोपायला गेले . काकी तश्या जाग्याच होत्या. मध्यरात्र झाली आणि ३ वाजता आवाज सुरु झाला . आज मात्र ... हा काठीचा आणि घुंगरांचा आवाज जास्त मोठा होता. कानठळ्या बसतील असा होता .
काकी पटकन उठल्या आणि त्या त्रिवं आवाजाने काका पण उठले . काकापण थोडे आवक झाले . त्यांनी बाहेर जाण्यासाठी प्रयत्न केले परंतु मालती काकूंनी त्यांना बाहेर जाऊ दिले नाही.
थोड्यच वेळात आवाज बंद झाला . काकाना आवाज कशाचा आहे हे कळात नव्हते . याचा अंदाज लावनेपण कठीणच .
काकींनी तर हा आवाज दोन दिवस ऐकला होता, या वेळी काका काकी दोन्ही घारबलेले. काकांनी आज या प्रकरणाचा चडा लावायचे ठरवले . तिकडे काकी देवाचा धावा करत होती. आजही काकूंनी कचरा त्याच ठिकाणी टाकला. आता रात्र झाली .पूर्ण दिवस टेन्शन मध्ये गेला होता . काकांनी झोपताना एक मोठा दांडा आपल्या बाजूला ठेवला.
कोणीतरी मुद्दामच हे करत असावे असं त्यांना वाटू लागले. काकी बराच वेळ देवाचे नाव घेत होते आणि मध्ये त्याचा डोळा लागला . मात्र काका जागे होते . आणि पुन्हा आवाज सुरु झाला ते पाहण्यासाठी काका बाहेर गेले कोणी दिसत नव्हते.आणि आवाजही बंद झाला होता. शेवटी घरात आल्यावर काकांना जे दिसले ते मात्र भयाण होते. जिथे काकू झोपल्या होत्या तिकडे नव्हत्या. घरात काकू कुठेही नव्हत्या काकांनी खूप शोधले... परंतु काकू कुठेही नव्हत्या.
काकूंचे काय झाले असेल? त्या कुठे गेल्या असतील? असे बरेच प्रश्न आपल्या मनात आले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास आमच्या या विडिओ मध्ये नक्की मिळतील.... त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला comment करून कळवायला विसरू नका.
Comments
Post a Comment