Posts

Showing posts from July, 2020

देवचार / क्षेत्रपाल / महापुरुष / राखणदार

Image
देवचार म्हणजेच देवाचा एक अवतार... तर आजच्या कथेचे नाव आहे देवचार. आधी मी तुम्हाला देवचार म्हणजे काय ते सांगतो देवचार म्हणजेच देवाचा एक अवतार ज्याला काही ठिकाणी क्षेत्रपाल, महापुरुष किंवा राखणदार असेही  म्हटले जाते. मजबूत देहयष्टी, सफेद धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात घुंगरू लावलेली काठी आणि एका हातात मशाल असा एकंदर देवाचा अवतार असतो. प्रत्येक गावात देवचाराची एक ठरलेली वाट असते ज्या वाटेवरुन देवचार गावातून फेरी मारतो. अशा वाटेला गावात देवाची वाट असे ही म्हटले जाते. गावातील एका जागेवर देवचाराचे स्थान असते इकडे गावकरी येता-जाता देवचाराचे दर्शन घेतात.देवचार , महापुरुष याचे मंदिर किंवा मोठा वृक्ष  कोकणात प्रत्येक गावी पहावयास मिळतात.  ज्याप्रमाणे देवचार गावातील लोकांचे रक्षण करतो त्याचप्रमाणे गावकर्यांना देखील त्याचे काही नियम पाळावे लागतात जसे कि देवचाराच्या वाटेवर कधीच घाण किंवा कचरा करू नये. देवाच्या वाटेवर कधीच झोपू नये  किंवा कसलाही अडथळा आणू नये. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळी जर तुम्हाला देवचाराचे  दर्शन झाले तर न घाबरता किंवा न किंचाळता गप्प डोळे मिटून घेणे....